ट्रेलर साठी खाली पाहा
सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या ला वीस दिवस उलटून गेले असले तरी आणखीन आत्महत्येचे खरे कारण समजू शकले नाही. आजही फॅन्सना विश्वास बसत नाही की सुशांत याने जगाचा निरोप घेतला. पोलिसांना रोज नवीन काही ना काही माहिती मिळत आहे, तर फॅन्स कडून सीबीआय चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सुशांतने निधनाच्या काही महिने अगोदर एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केली होती. “दिल बेचारा” हे त्याच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव असून फॅन्सना या चित्रपटाची खूप उत्सुकता होती. हा चित्रपट हॉटस्टार डिज्नी यावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत संजना सांघी या अभिनेत्री ने काम केले आहे.
“दिल बेचारा” हा चित्रपट “द फॉल्ट इन ऑर स्टार्स” या कादंबरी वर आधारित असून ही दोन कॅन्सर पीडित जोडीदाराची गोष्ट आहे. सुशांत चा चित्रपटातील एक डायलॉग ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. “जन्म कब लेना है और मरना कब है यह हम डिसाइड नहीं कर सकते मगर कैसे जीना है, वह हम डिसाइड कर सकते हैं”
सध्या सोशल मीडियावर हा चित्रपटाचा ट्रेलर ट्रेंडिंग आहे. हा चित्रपट 24 जुलैला प्रदर्शित होणार असून अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करेल हे नक्की. ट्रेलर आवडले तर जास्तीत जास्त शेयर करा
पहा ट्रेलर