व्हिडिओ साठी खाली पाहा
सुशांत सिंग राजपूत या बॉलीवूडच्या अभिनेत्याच्या आत्महत्येवर आणखीनही प्रश्नचिन्ह कायम आहेत. सर्वत्र त्याच्या आत्महत्येवर संशय व्यक्त करून सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने देखील सीबीआय चौकशी करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केली आहे.

या सर्व घडामोडी चालू असतानाच अमेरिकेतील एक पॅरानॉर्मल एक्सपर्ट म्हणजेच अलौकिक तज्ञ स्टीव्ह हफ यांनी एक अजब व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चैनल वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या आत्म्यासोबत बोलत असल्याचा दावा करीत आहेत. परंतु या व्हिडीओ मागची सत्यता जाणून घेऊयात.

भारताचे पॅरानॉर्मल एक्सपर्ट नीरव आनंद यांनी या बद्दल एक माहिती सांगितली आहे. “आम्ही व्हिडीओ 100% खरा मानत नाहीत, परंतु यासंदर्भात अनेक शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. आपल्या बद्दलच्या गोष्टी या काल्पनिक असतात. या विज्ञान युगात सायंटिफिक पॅरामिटरच्या माध्यमातून काही वैज्ञानिक आत्म्यास सोबत बोलण्या बाबतीत संशोधन करीत आहेत.”
स्टीव्ह हफ ने एक उपकरण तयार केले असल्याचे सांगतात व ते गेल्या 10 वर्षापासून लोकांच्या आत्म्यासोबत बोलत असल्याचे सांगतात. या व्हिडिओ मधील आवाज हा सुशांतचा वाटत नसला तरी त्यांनी एक प्रश्न विचारला, “आर यू इन द लाईट?”. त्यावर समोरून आवाज आला, “आय एम गेटींग लाईट.” माझा खून झाला असे सुशांत ने म्हटल्याचे देखील स्टीव्ह दावा करतात.
पाहा व्हिडिओ :