सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येला पंचवीस दिवसही झाले नाहीत तोच आणखीन एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे सिनेजगतात आणखीन एक वेळेस खळबळ माजली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कन्नड चित्रपट सृष्टी मधील प्रसिद्ध अभिनेता सुशील गौडा या अभिनेत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सरते 2020 हे वर्ष खरोखरच धोकादायक असेच जात आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे अभिनय क्षेत्रातील एकापाठोपाठ एक कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. सुशील गौडा हा कर्नाटक मधील कन्नड भाषांमधील मालिकेत काम करीत होता. येत्या काही महिन्यात त्याचा “सलगा” हा चित्रपट येणार होता. या चित्रपटात त्याने पोलिसाची भूमिका साकारली आहे.
32 वर्षीय सुशील ने मंड्या(कर्नाटक) येथे स्वतःच्याच घरी आत्महत्या केली असली तरी आत्महत्येचे खरे कारण कळू शकले नाही. सुशील हा अगोदर ट्रेनर म्हणून काम करायचा व नंतर त्याने कन्नड मालिका अंतपुरा मध्ये काम केले व तिथूनच त्याने प्रसिध्दी मिळविला होता.
गेल्याच महिन्यात कर्नाटक मधील चिरंजीवी सर्जा या अभिनेत्याचे निधन झाले होते. त्यानंतर सुशील ने केलेल्या आत्महत्येमुळे कन्नड सृष्टीत आणखीन जास्त दुःखाची भर पडली आहे. त्याच्या येणारा चित्रपट “सलगा” मधील अभिनेता “दुनिया विजय” याने पोस्ट करीत भावना व्यक्त केल्या. “जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो हिरो सारखा वाटला होता चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच तो निघून गेला. आत्महत्या करणे हे कोणत्याही समस्येवर उपाय नसतो”, असे दुनिया विजय यांनी दुःख व्यक्त केले.