सध्याच्या पिढी मोबाईल टीव्ही मध्ये गुंतून राहिलेली दिसते. लहान बाळांना देखील आजकाल टीव्ही आणि मोबाईलचे वेड असलेले दिसून येते. काहींना कार्टून्स, काहींना गाणी, तर काहींना गेम्स चे वेड असते. पाच सहा महिन्याचे बाळ देखील मोबाईल किंवा टीव्हीला पाहून रडणे थांबवित असते.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होता आहे, ज्यातील एका पाच महिन्याच्या लहान मुलीला स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या शीर्षक गीताचे प्रचंड वेड असल्याचे व्हिडिओ मधून दिसून येत आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने लहानापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच वेड लावले होते. परंतु इवल्याश्या या मुलीला या गाण्याप्रति असलेले प्रेम एक नवलच म्हणावे लागेल.
खालील व्हिडिओ मधील लहान मुलगी ही सनी बापूराव वाडेकर यांची आहे. खराडी, चंदन नगर, पुणे येथे राहत असलेले सनी वाडेकर यांच्या मुलीचा हा व्हिडिओ डॉ. अमोल कोल्हे यांनी शेयर केला. असे ऐकण्यात येत आहे की या मुलीचा जन्म शिवजयंतीला म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी झाला होता. तीचे नाव शिवज्ञा हे ठेवण्यात आले आहे.
अमोल कोल्हे यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना या लहान मुलीला गाणे ऐकण्यासाठी दैविक ऊर्जा मिळाली असेच म्हणावे लागेल. सर्वच स्तरातून शिवज्ञा या लहान बाळाची चर्चा होत आहे. सर्वांनी कमेंट करून तीचे भरभरून कौतुक देखील केले आहे.
पाहा व्हिडिओ :