झी मराठी वरील काही मालिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या आहेत. त्यामध्ये 2011 साली आलेली “उंच माझा झोका” ही मालिका देखील प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. एकोणिसाव्या शतकातील सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित “उंच माझा झोका” ही मालिका बनविण्यात आली होती. या मालिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता.
“उंच माझा झोका” ही मालिका सुरू होण्यापूर्वी खूप जणांना रमाबाई रानडे विषयी थोडीदेखील माहिती नव्हती. स्त्री हक्कासाठी लढणाऱ्या रमाबाई रानडे यांचा विवाह वयाच्या 11 व्या वर्षीच झाला होता. या मालिकेत छोट्या रमाबाई रानडे हिचे पात्र “तेजश्री वालावलकर” या चिमुकली ने साकारली होती. तेजश्री आता मोठी झाली असून तिच्या फोटो पाहून ती जराही ओळखू येणार नाही.
रमाबाई यांची उत्तम अशी भूमिका तेजश्री ने बालवयातच साकारली होती. घराघरांतून तीच्या अभिनयाची चर्चा होवू लागली होती. काही महिने काम केल्यानंतर मालिकेत रमाबाई ला मोठे झालेले दाखविण्यात आले. त्यामुळे तेजश्री ची जागा स्पृहा जोशी या अभिनेत्रीने घेतली होती. तेजश्री त्या मालिकेनंतर अभिनय क्षेत्रात जास्त दिसून आली नाही.तरी तीने काही मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे.
“उंच माझा झोका” मालिकेत रमाबाई रानडे यांच्या पतीचा म्हणजेच महादेव रानडे यांचा अभिनय विक्रम गायकवाड तर रमाबाईंच्या वडिलाचे पात्र शरद पोंक्षे यांनी साकारले होते. सर्वांच्या उत्तम अभिनयामुळे मालिकेला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवले होते. तेजश्रीला इतक्या वर्षानंतर पाहून प्रेक्षकांना देखील आनंद झाला असणार, हे नक्की.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.