बॉलिवूडची अभिनेत्री मिस युनिव्हर्स उर्वशी रौतेला हिचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. बिग बॉस सीजन 8 चा विजेता गौतम गुलाटी आणि उर्वशी रौतेला या दोघांचा लग्न करतानाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Urvashi marriages Bhatia

मिस युनिव्हर्सचा किताब पटकावल्यानंतर उर्वशीला लगेच बॉलीवूडमध्ये अनेक ऑफर आल्या. बॉलिवूडमधील तिचे सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्री मध्ये नाव घेतले जाते. परंतु गौतम गुलाटी ने इंस्टाग्राम वर एक फोटो पोस्ट करून चर्चेला उधाण आणले. या फोटोमध्ये गौतम आणि उर्वशी सात फेरे घेताना दिसत आहेत.

गौतम ने हा फोटो पोस्ट करताना कॅप्शन मध्ये असे देखील लिहिले, “शादी मुबारक नही बोलोगे?”. ही पोस्ट पाहून काही वेळासाठी दोघांचे फॅन्स संभ्रमात पडले होते. परंतु या दोघांनी खरोखर लग्न केले नाही. या दोघांच्या एका आगामी चित्रपटातील हा फोटो आहे.

Urvashi marriages Bhatia

येत्या 16 जुलैला “वर्जिन भानुप्रिया” या नावाचा चित्रपट झी5 वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आला असून लाखो लोकांनी या ट्रेलर ला पाहिले आहे. उर्वशी चे नाव यापूर्वीही क्रिकेटर हार्दिक पांड्या याच्याशी जोडले गेले होते. आताही उर्वशी आणि गौतम हे फक्त चित्रपटाचा भाग आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *