कोरोना महामारीच्या संकटापासून सुरक्षित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून नेहमीच सतर्कता व सुरक्षित राहण्याचे आव्हान केले जात असते. गेल्या 4-5 महिन्यापासून महाराष्ट्रात जागोजागी पोलीस तैनात करून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. अशातच महाराष्ट्र पोलीस त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हटके ट्विटमुळे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी झी मराठीवरील “अग्गबाई सासुबाई” या मालिकेतील बबड्या संदर्भात मजेशीर ट्विट केले आहे. त्यांनी बबड्याचा उल्लेख करत कोरोनासंदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेतील काही भागात बबड्याला मास्क घातलेले दाखविण्यात आले आहे, त्यावरच महाराष्ट्र पोलिसांनी मजेशीर ट्विट केले आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट करताना, “कथानकात ट्विस्ट आहे!
बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही, परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे”, असे लिहिले. हे वीट करताना त्यांनी बबड्याची मास्क घातलेली फोटो देखील पोस्ट केली आहे. सोबतच त्यांनी मास्क वापरण्यास सांगितले आहे व फोटोमध्ये बबड्या मास्क लावतो, बबड्या सुधारला आहे असे देखील लिहिले आहे.
कथानकात 'ट्विस्ट' आहे!
बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे.#UseAMask#FollowUnlockGuidelines pic.twitter.com/vNB2VIkWX8
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) August 20, 2020
अग्गबाई सासुबाई मालिकेत आशुतोष पत्की या अभिनेत्याने बबड्याची भूमिका साकारली असून त्याचे मालिकेतील नकारात्मक पात्र पाहून सर्व प्रेक्षक त्या पात्राला ट्रोल करताना दिसून येतात. सोशल मीडियावर देखील त्याचीच जास्त चर्चा चालू असते. यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी बबड्याचा उल्लेख केला आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा