कोणताही धर्म शांतता ठेवणे व दुसऱ्या धर्माचा आदर करण्याचाच संदेश देत असतो. सध्या 2 अभिनेते गणपती पुजनामुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल होता दिसून येत आहेत. एकीकडे प्रवीण तरडे यांनी सविंधानाचे पुस्तक गणपतीच्या खाली ठेवल्याने अनेकांनी त्यांच्याबद्दल आक्षेप घेतला.
दुसरीकडे हिंदी मालिकेत काम करणारा मुस्लिम अभिनेत्याला पण असेच ट्रोल करण्यात आले. या मुस्लिम अभिनेत्याचे नाव आमिर अली असून तो हिंदी मालिकांमध्ये काम करतो. आमिरने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्याच्या घरी गणरायाची स्थापना केली व त्यासंबंधित पोस्ट केली देखील केली. त्यावर मुस्लिम समुदायातील काही लोकांनी यावर आक्षेप घेत आमीरला चूकीचे केल्याचे सांगितले.
एका युजर ने कमेंट करताना असे म्हटले, “घरात गणपती बसविणे हे इस्लाम मध्ये गुनाह मानला जातो. तू दुसऱ्या धर्माचा आदर करता, हे ठीक आहे. परंतु त्याचा अर्थ तुम्ही त्यांची पूजा कराल असा होत नाही”. यासारख्या काही कमेंट्स ना अमीर ने दिलेला रिप्लाय सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
अमीर ने रिप्लाय मध्ये “मी मुस्लिम आहे, पण त्याचा अर्थ मी दुसऱ्या धर्माचा आदर करणे थांबवू शकत नाही. देव एकच आहे. मी अल्लाह वर विश्वास ठेवतो, माझे मित्र, भाऊ आणि अन्य काही दुसऱ्या धर्मावर विश्वास ठेवतात. हे ठीक आहे. प्रेम व शांतता ठेवा.” आमिरने कहानी घर घर की, वो रहने वालों महलों की, क्या दिल में है अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या या रिप्लायने अनेकांची मने जिंकली आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.