सध्याची मराठीवरील चर्चेचा विषय ठरलेली मालिका अगबाई सासुबाई ही होय. या मालिकेत असावरीची भूमिका साकारणाऱ्या निवेदिता सराफ यांना मालिकेत मुलगा बबड्याचा अती लाड करताना दिसून येत आहेत. आणि त्या लाडातच बबड्याला खूपच वाईट दाखवण्यात आले आहे. याच कारणाने बबड्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
मालिकेत जरी मुलगा चांगला दाखविण्यात आला नसला तरी खऱ्या आयुष्यात मात्र निवेदिता सराफ व अशोक शराफ यांचा मुलगा खूप चांगला आहे. स्वतःचे आई -वडील अभिनय क्षेत्रात असून देखील मुलगा अनिकेत हा स्वतःला अभिनयापासून दूरच ठेवला आहे. आईवडिलांची लोकप्रियतेचा फायदा न घेता अनिकेतने स्वतःचे करिअर स्वतः पुढे चालवले आहे.
सर्वांना माहितीच आहे निवेदिता सराफ अभिनयासोबत उत्तम स्वयंपाक करतात. त्यांच्या स्वयंपाकाच्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर दिसून आले आहेत. आईच्या याच कलेला पाहून अनिकेतने देखील शेफ बनण्याचे धेय्य ठेवले होते. सुरुवातीला त्यांने स्वयंपाक आवड म्हणून करीत होता व नंतर त्याने यालाच स्वतःचे करीयर म्हणून चालवीत आहे.
फ्रान्स पॅरिस या देशात जाऊन अनिकेतने कुकिंग बद्दल प्रशिक्षण घेतले. तिकडच्या पदार्थांची माहिती घेत तो कुकिंग मध्ये परिपक्व झाला होता. आता तो भारतात लोकप्रिय शेफ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे अनेक व्हिडिओज गेट करीड या यूट्यूब चैनल वर दिसून येतात व उत्तम रेसिपी बनविताना तो दिसत असतो. मालिकेततील असावरीचा मुलगा बबड्या जरी बिघडला असला तरी खऱ्या आयुष्यातील बबड्या मात्र उत्तम स्वभावाचा आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा..