काही दिवसापूर्वी मराठी अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याची पत्नी एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख ही आहे. काल दिनांक 11 जून रोजी आशुतोषचा जन्मदिवस असल्याने मयुरीच्या सासूने म्हणजेच अनुराधा भाकरे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. ती वाचून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ashutosh bhakare  news update


अनुराधा यांनी पोस्ट करताना असे लिहिले, “आज आशुचा 32वा वाढदिवस. आशुला जाऊन 13 दिवस झाले. या 13 दिवसात त्याच्या आयुष्यातील सर्वकाही डोळ्यासमोरून तरळून जाते. त्याला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वांनी केले प्रयत्न आठवीतात. आम्ही सर्वांनीच त्याला आपापल्या परीने त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मयुरी देखील मला नेहमी म्हणायची की आपण आशुला यातून बाहेर काढूच.”

ashutosh bhakare  news


पुढे बोलताना अनुराधा म्हणाल्या, “आशुतोष कडे लक्ष देण्यासाठी मयुरीने गेल्या 2 वर्षात अनेक सीरिअल्स नाकारल्या. फक्त आशुच्या आग्रहास्तव तीने एखादे नाटक व चित्रपट स्विकारले. त्या काळात मयुरीने अगदी लहान बाळासारखे आशुची काळजी घेतली. स्वयंपाकघरात आशू व मयुरी दोघेच विविध प्रयोग करीत असे. पत्ते, लुडो, कॅरम असे असे खेळ आम्ही खेळायचो व त्यात 80% आशूच जिंकायचा. कारण तो बऱ्यापैकी रिकव्हर झाला होता. पण तो असे काही करेल आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. आम्हा सर्वांची नजर चुकवून तो गेला.”

ashutosh bhakare  news

“आशूच्या दहाव्यानंतर रीतीरिवाजानुसार मयुरीने माहेरी जायला हवे, परंतु तिने आम्हा दोघांच्या काळजी साठी माहेरी जाणार नसल्याचे सांगितले, केवढी प्रगल्भता इतक्या कमी वयात माझ्या मुलीत (मला 2 मुलेच असल्याने मी मयुरीला कधी सून मानलेच नाही). ती माझी सून नसून मुलगी आहे, हे प्रकर्षाने जाणवले”, असे अनुराधा यांनी पुढे लिहिले. तसेच त्यांनी नैराश्यात असणाऱ्या लोकांना दुर्लक्ष न करण्याचे व त्यांची काळजी घेण्याचे आव्हान देखील केली आहे.

ashutosh bhakare  news

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *