कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरात संकटामुळे सर्व जण हैराण झाले आहेत. सर्वत्र लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच सध्या सर्वत्र चोरी करणाऱ्या टोळ्यांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. विविध ठिकाणी चोरी झालेल्या घटना ऐकण्यात येत आहेत.

bharat ganeshpure news


लोकप्रिय हास्यकलाकार भारत गणेशपुरे यांच्यासोबत देखील अशीच एक वाईट घटना घडली आहे. 6 ऑगस्टच्या रात्री भारत गणेशपुरे स्वतःची कार घेऊन कांदिवली येथील वेस्टर्न एक्सप्रेस वरून प्रवास करीत होते. तितक्यात समोरून दोघांनी त्यांची गाडी अडविली. नंतर एकजण त्यांच्या काचेजवळ अाला आणि दुसरा कारच्या दुसऱ्या बाजूला गेला. दोघांनी भारत यांच्या कार वर जोर जोरात हात मारले.

bharat ganeshpure news


ते दोघे वेगवेगळे हावभाव करीत होते. भारत यांनी काच उघडला नव्हता. परंतु त्यांच्या बाजूच्या व्यक्तीने कारचा दरवाजा उघडला. त्याच वेळी दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने जोरात काचेवर हात मारली. भारत गणेशपुरे यांनी दुसऱ्या बाजूला पाहिले तेंव्हाच त्यांच्या बाजूच्या व्यक्तीने त्यांचा मोबाईल घेतला व दोघे तिथून फरार झाले.

ही माहिती भारत गणेशपुरे यांनी व्हिडिओ द्वारे दिली. त्यांनी सर्वांना सतर्क राहण्याचे आव्हान केले. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओचा एका व्यक्तीला फायदा देखील झाला. दुसऱ्याच दिवशी एका व्यक्तीला तशाच संकटाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी भारत गणेशपुरे यांचा व्हिडिओ पाहिल्याने त्यांनी तिथून पळ काढला.

bharat ganeshpure news

ही माहिती जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.