आजचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी दुःखद दिवस आहे. कारण भारतीय क्रिकेटचे दोन स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या दोघांनी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे करोडो फॅन्समध्ये नाराजी दिसून येत आहे. धोनीचे क्रिकेट करिअर चालू असताना त्याच्या प्रेम प्रकरण बद्दल देखील अनेक चर्चा झाल्या होत्या.

 dhoni special


झारखंड मधील रांची या छोट्या शहरातून आलेल्या धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर आपल्या अफलातून फलंदाजीचे जलवे दाखवायला सुरू केले. तो अल्पावधीतच इतका लोकप्रिय झाला की काही अभिनेत्री देखील त्याच्यासाठी वेड्या झाल्या होत्या. क्रिकेट खेळताना स्टेडियम मधून तर खूप प्रपोजल यायचेच परंतु त्याच बरोबर मोठ्या अभिनेत्री देखील धोनीच्या प्रेमात वेड्या होत्या.

dhoni special

“लक्ष्मी राय” ही पहिली अभिनेत्री होती जिच्यासोबत धोनीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघेजण अनेकदा एकत्र दिसण्यात आले होते. परंतू धोनीची क्रिकेट मध्ये सुरुवात असल्याने त्यांने क्रिकेटला पसंती दिली व त्यामुळेच लक्ष्मी राय सोबत संबंध संपविले असावे. मागील काही वर्षात लक्ष्मीने स्पष्ट केले की धोनी आता त्याच्या वैवाहिक आयुष्यात असल्याने या विषयावर चर्चा करणे थांबविण्यास सांगितले.

dhoni special

dhoni special


महेंद्रसिंग धोनी हा बॉलीवूड ची सध्याची लोकप्रिय अभिनेत्री “दीपिका पदुकोण” सोबत देखील रिलेशन मध्ये होता. या दोघांनी जवळपास दोन वर्ष एकत्र घालवली असल्याची चर्चा झाली होती. दोघे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये देखील असल्याचे उघड झाले होते. सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपीका पदुकोणला पाहिले जाते. धोनी नंतर दीपिकाचे नाव युवराज सिंग सोबत देखील जोडले गेले होते.

dhoni special

dhoni special

धोनीचे नव जोडली गेलेली तिसरी अभिनेत्री आहे “असीन”. साउथ मधून अभिनयाची सुरुवात करणारी ही गजनी, रेडी काही लोकप्रिय चित्रपटातून दिसून आली आहे. खरे तर धोनी आणि असीनचे नाव धोनीच्या लग्नानंतर जोडले गेले होते. गंमत तर तेव्हा झाली होती, जेव्हा धोनी आणि त्याची पत्नी साक्षी श्रीलंकेमधील ज्या हॉटेलमध्ये राहिले होते तिथे असीन देखील दिसून आली होती. परंतु नंतर दोघांच्या प्रेमा बद्दल चर्चा बंद झाल्या.

dhoni special

dhoni special

धोनीला त्याच्या आगामी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *