सुशांत सिंग राजपूतची पूर्व मॅनेजर दिशा सलियन सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरच आत्महत्या केली होती. दोघांनी एका पाठोपाठ एक जगाचा निरोप घेतल्याने दोन्ही प्रकरणाचा एकमेकांशी संबंध असल्याचे बोलले जात होते. दिशाने आत्महत्या केलेल्या रात्री नेमके काय झाले होते याचा खुलासा त्या पार्टीत सहभागी असलेल्या मैत्रिणीने केला आहे.
8 जून रोजी रात्री दिशाच्या घरी पार्टीचे नियोजन करण्यात आले होते. या पार्टीत तिचा होणारा नवरा रोहन व व अन्य चार मित्र मैत्रिण होते. त्या पार्टीत सहभागी असणाऱ्या दिशाच्या मैत्रिणीने असे सांगितले, “त्या रात्री पार्टीत आम्ही सर्वांनी मद्यपान केले होते. मध्यपान केल्यानंतर दिशा वारंवार माझी कोणीच काळजी घेत नाही असे म्हणत भावुक झाली होती.”
पुढे दिशाच्या मैत्रिणीने सांगितले, “नंतर दिशा तिच्या यूकेतील एका अंकिता नावाच्या मैत्रिणी सोबत फोनवर बोलू लागली. तीच्याशी बोलताना दिशा रडू लागली व बोलत-बोलत रूम मध्ये गेली. तिने रूमचा दरवाजा आतून बंद केला. बराच वेळ बाहेर न आल्यामुळे मित्रांनी दरवाजा तोडला पण दिशा रूम मध्ये नव्हती. जेंव्हा दोघांनी खिडकीतून खाली पाहिले तेंव्हा दिशा खाली पडलेली होती.”
“दिशाला खाली पाहून सर्वांना धक्काच बसला. सर्वजण खाली जाईपर्यंत दिशाने प्राण सोडले होते,” असे त्या मैत्रिणीने सांगितले. मैत्रिणीच्या या खुलाशामुळे दिशा वर बलात्कार झाला किंवा तिचा खून करण्यात आला, या अफवांवर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.