आधुनिक जगात पुरुषांचे व महिलांचे पूर्वीप्रमाणे घनदाट व लांब केस खूप कमी प्रमाणात दिसून येत आहेत. खाण्यापिण्यातील बदल व आधुनिक हेअर प्रॉडक्ट वापरल्याने असे दुष्परिणाम होऊ लागले आहेत. केस गळण्याचे प्रमुख कारण म्हणजे कोंडा. कोंड्यामुळे केसात खाज सुटणे, जखमा होणे या देखील समस्या उद्भवतात. चला तर मग जाणून घेऊयात कोंडा दूर करण्यासाठी व केस गळती थांबवण्यासाठी काय उपाय आहेत.
केसांच्या मास्कसाठी लागणारे साहित्य : आल्याचे काही तुकडे, तीन चमचे दही, दोन चमचे मेथीचे दाणे, 1 चमचा बेसन, अर्धा लिंबू, तीन चमचे खोबरेल तेल.
क्रिया : सर्वात आगोदर दोन चमचे मेथीचे दाणे एका वाटीमध्ये तीन तास पाण्यात भिजवत ठेवा. नंतर त्या मेथीला आल्यासोबत मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. नंतर त्या पेस्टमध्ये दोन चमचे खोबरेल तेल आणि अर्धा लिंबू पिळून टाका. लिंबाच्या बिया त्यात पडू देऊ नका. नंतर तीन चमचे दही आणि एक चमचा बेसन टाकून सर्व सामग्री मिक्स करून घ्या. ज्या वाटीत मेथी भिजवली होती ते पाणी त्या मिश्रणात टाकून पेस्ट बनवा.
नंतर ते मिश्रण केसाला लावून मसाज करा. 1 तासानंतर ते सुकल्यानंतर कोमट पाण्याने छान धुवून टाका. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्याच दिवशी शाम्पू चा वापर न करता, दुसऱ्या दिवशी करावा. हे आठवड्यातून एकदा व एकूण 6 आठवडे लावा. नंतर तुमच्या केसातील कोंडा कमी झालेला दिसेल व केस पण चमकदार दिसतील.
तसेच केस गळती कमी होवून केसांची वाढ होण्यास देखील मदत होते. माहिती आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कळवा व जास्तीत जास्त शेयर करा..