देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गायकांना मोठा प्लॅटफॉर्म देणाऱ्या इंडियन आयडल ह्या शो संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे. इंडियन आयडल-10 या सीझनमधील एक लोकप्रिय गायिका रेणू नागर ही सध्या आयसीयूमध्ये असल्याची बातमी समोर आली आहे. तिची तब्येत खालविल्याचे कारण देखील धक्कादायक आहे.
रेणू नागर ही राजस्थानच्या अलवर या छोट्याश्या शहरात राहते. जिथे महिला चेहरा देखील लपवून ठेवतात अशा ठिकाणाहून आलेली रेणू नागर ही याच कारणाने चर्चेत होती. तीच्या आवाजामुळे अनेक सेलिब्रिटीनी तीची प्रशंसा केली होती. परंतु, जून महिन्यात रेणू ही तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली होती.
रेणूच्या वडिलांनी या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 5 दिवसापूर्वी रेणूला घरी वापस आणण्यात आले होते व रवी देखील त्याच्या गावी परत गेला होता. परंतु काल दि. 28 ऑगस्टच्या रात्री रवीने विषारी पदार्थ खाल्ल्याने त्याला जीव गमवावा लागला. ही बातमी ऐकताच रेणू नागरला मोठा धक्का बसला व ती चक्कर येऊन पडली.
रेणू ला दवाखान्यात दाखल केले असून ती सध्या आयसीयूमध्ये आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. रेणू नागरच्या बॉयफ्रेंडचे नाव रवी नट असून तो रेणूला तबला शिकवण्यासाठी तिच्या घरी यायचा. रवी हा विवाहित होता व त्याला दोन मुले देखील आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करुन कळवा व शेअर करायला विसरू नका