बॉलीवुड मधील शेरनी म्हणून ओळख असणारी अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कोणालाही न घाबरता कंगना नेहमी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत असते. याच स्वभावामुळे तीचे अनेक चित्रपट काढून घेण्यात आले होते. ती किती निर्भय राहते याचे आणखीन एक उदाहरण समोर आले आहे.
25 जानेवारी 2019 ला प्रदर्शित झालेला कंगणाचा “मणिकर्णिका” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी कंगनाला तलवारीने लढायचे होते. परंतु लढताना एका सहकलाकाराने मोठी चूक केली. त्याच्या चुकीमुळे कंगनाला मोठी जखम देखील झाली.
त्या सहकलाकारांने एक किलो वजनाच्या तलवारीने पहिलाच वार चुकीचा मारला. त्या चुकीच्या वार मुळे कंगनाच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जखम झाली होती. त्यामुळे सेट वर चितेंचे वातावरण झाले होते. परंतु कंगनाने त्याच वेळी जे म्हटले ते ऐकुन सर्वजण अवाक् झाले.
कंगनाने म्हटले, “झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी मला पेशव्यांचा तिलक लावला आहे, जो कायम माझ्या चेहऱ्यावर चमकत राहील.” तिच्या या उत्तराने कंगना खरेच सामर्थ्यवान महिला आहे, असेच दिसून येते. गेल्या 2 महिन्यापासून कंगना ही सुशांत सिंग राजपूत ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेअर करायला विसरू नका