गेल्या काही दिवसांपासून काही सेलिब्रिटींनी बाळाच्या आगमनाची बातमी दिल्या. क्रिकेटर हार्दिक पांड्याला मुलगा झाला, तर सैफ-करिना, विराट-अनुष्का यांच्या घरात लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. आता आणखीन एका सेलिब्रिटी जोडीने फॅन्सना आनंदाची बातमी दिली आहे.
हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेता करणवीर बोहरा या अभिनेत्याने त्याच्या वाढदिवशी ही माहिती दिली. करणवीर हा दुसऱ्यांदा वडील होणार आहे. करणवीर याची पत्नी अभिनेत्री टीजे सिधू हीने यापूर्वी 2016 मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने टीजे व करणविर दोघेही आनंदी आहेत.
आनंदाची बातमी देताना करणवीरने म्हटले, “मुले आपल्यामधून जन्माला येत असतात, परंतू सर्व काही देवाच्या हाती असते. सर्वकाही तोच घडवितो. आपण फक्त त्याच्या आशीर्वादाची वाट पाहत असतो. देवाने दिलेले हे सर्वात सुंदर सरप्राईज आहे. तसेच, हे सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट आहे.”
क्यू की सास भी कभी बहू थी, कसोटी जिंदगी की अशा अनेक मालिकांमध्ये करनवीर ने काम केले आहे. त्याची पत्नी टीजे हीने बेबी बंप ची फोटो देखील पोस्ट केली आहे. दोघांच्या 4 वर्षाच्या जुळ्या मुली बेल्ला आणि वीना या देखील खूप लोकप्रिय झाल्या असून दोघींचे इंस्टाग्राम वर 5 लाख फॉलोवर्स झाले आहेत. दोघांना येणाऱ्या बाळासाठी खूप खूप शुभेच्छा
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेअर करायला विसरू नका.