2020 हे वर्ष मृत्यूचे सत्र थांबविण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे कोरोनामुळे सामान्य जनतेचा मृत्यू होतोय तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक अभिनय क्षेत्रातील कलाकारांचे निधन होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड मध्ये नाव गाजवलेल्या मराठी दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे अखेर दुर्दैवी निधन झाले आहे.
काल पासून निशिकांत कामत यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरली होती. परंतू हैदराबादमधील ज्या दवाखान्यात त्यांचा उपचार चालू होता, तेथील डॉक्टरांनी आज दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचे निधन झाले नसून ते व्हेंटिलेटर वर असल्याची माहिती दिली होती. दुर्दैवाने आज संध्याकाळी 4.24 मिनिटाला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
50 व्या अखेरचा श्वास घेतलेल्या निशिकांत कामत यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टी मधून केली होती. डोंबिवली फास्ट या चित्रपटातून निशिकांत कामत यांनी त्यांच्या दिग्दर्शनाची तयारी केली होती. मराठी मधील “लय भारी” या रितेश देशमुखच्या गाजलेल्या चित्रपटासाठी देखील निशिकांत यांनीच दिग्दर्शन केले होते.
मराठी सोबतच निशिकांत कामत यांनी बॉलीवुड मध्ये देखील आपल्या दिग्दर्शनाचा दबदबा कायम ठेवला. त्यांनी फोर्स, दृश्यम, डॅडी, मदारी असे एका पेक्षा एक उत्तम सिनेमे बनविले आहेत. त्यातील दृश्यम चित्रपट खूपच गाजला व या चित्रपटाने अनेक अवार्ड देखील पटकावले होते.
निशिकांत यांच्या निधनाने मराठी अभिनय क्षेत्र तसेच बॉलीवूड मध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम दिग्दर्शक गमवला आहे. माहिती जास्तीत जास्त शेयर करा.