सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गेल्या 70 दिवसांपासून एकापेक्षा एक गंभीर आरोप लावले गेले. पोलीस, ईडी, सीबीआय यांनी रियाची कसून चौकशी केली. परंतु आता तरी या पहिल्यांदाच मीडियासमोर बोलली आहे. “आज तक” या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रियाने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

मुलाखतीदरम्यान रियाने म्हटले, “सुशांतसोबत प्रेम केल्याची मला आज शिक्षा भोगावी लागत आहे. मी एक निरागस मुलगी एका निरागस मुलावर प्रेम केले होते. माझ्यावर लावण्यात येत असलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. मी सुशांतचा एकही रुपया घेतला लुबाडले नाहीत. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत.”
पुढे मुलाखतीत रियाने सुशांतच्या परिवाराबद्दल धक्कादायक व्यक्तव्य केली आहेत. “सुशांतच्या परिवाराने माझे जीवन खराब करून टाकले आहे. सर्वजण म्हणतात माझे आणि सुशांतचे नाते संबंध ठीक नव्हते. खरेतर सुशांत व त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांमध्ये नेहमी वाद व्हायचे. मी जर सुशांतला घरात बंद करून ठेवत आहे असे त्यांना वाटत होते तर मग त्यांनी त्यावेळेसच का लेखी तक्रार दाखल केली नाही.”
इतक्या दिवसानंतर मिडीयासमोर का आली असे विचारण्यात आल्यानंतर रियाने म्हटले, ” मला सुशांतने बोलण्यास सांगितले. सुशांत माझ्या स्वप्नात अाला होता आणि मला सत्य बोलण्यास सांगितले व आपले नाते काय होते हे सर्वांना सांग म्हटले.” सुशांतच्या मृत्यूनंतर रियाच्या पहिल्याच मुलाखतीत या प्रकरणाला वेगळेच वळण येण्याची शक्यता आहे.
माहिती कशी वाटली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा व शेअर करायला विसरू नका.