सध्या सोशल मीडियावर स्टार किड्स ना घेऊन अनेक नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या स्टार किड्स पैकी एक अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तीच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर यांची कन्या श्रद्धा कपूर एका व्यक्ती सोबत विवाह करणार असल्याचे समजते.
श्रद्धाने निवडलेल्या मुलाचे नाव रोहन शेष्ठा हे आहे. श्रद्धा स्वतः जरी स्टार किड्स मध्ये समाविष्ट असली तरी रोहन हा कोणी स्टार कीड नाही. मुळात रोहन हा अभिनेता नसून तो एक उत्तम फोटोग्राफर आहे. बॉलीवुड मध्ये गेल्या काही वर्षांपासून तो प्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून काम करतो.
असे ऐकण्यात येत आहे की श्रद्धाने निवडलेला मुलगा शक्ती कपूर यांना देखील पसंत असून त्यांनी देखील दोघांच्या लग्नाला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे श्रद्धा व रोहन लवकरच विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे. परंतु याबाबतीत दोघांनीही अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
आशिकी – 2 या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या श्रद्धा कपूर अल्पावधीतच लोकप्रिय झाली. रोहन पूर्वी श्रद्धा चे नाव फरान अख्तर याच्याशी जोडले जात होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. परंतु आता रोहनचे नाव पुढे आल्याने सर्व अफवांवर पूर्णविराम बसला आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा..