श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाची पुजा केली जाते, ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. शिवशंभु ची पूजा मनोभावे केल्यास त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी असतो. यासोबतच श्रावण महिन्यात शिवशंभूच्या परिवाराची पूजा करणे चांगले मानले जाते.
ज्याप्रकारे सोमवारी शिवची पूजा केली जाते त्याच प्रकारे शिवपुत्र गणरायांची पूजा बुधवारी करणे शुभ मानले जाते. गणरायांची पूजा श्रावण महिन्यातील बुधवारी केल्याने त्यांचे आशीर्वाद कायम पाठीशी असतात. चला मग पाहुयात कशाप्रकारे श्रावण महिन्यातील बुधवारी नेमके काय करायला हवे.
शास्त्रानुसार श्रावण महिन्यातील बुधवारी गणपतीला मनोभावाने दुर्वा, अक्षदा, आगरबत्ती, जल हे सर्व अर्पण करावे. तसेच, गणपतीचे प्रिय खाद्य मोदक अर्पण करावे. तसेच गणरायाची आरती करावी व शेवटी नैवेद्य अर्पण करावे. अशा प्रकारे पूजा केल्याने एखाद्याच्या कुंडलीमध्ये दोष असेल तर तो निघून जातो, असे म्हटले जाते.
श्रावण महिन्यातील प्रत्येक बुधवारी गणेश मंत्र व गणेश स्त्रोत्रचे पठण हे देखील केले पाहिजे. तसेच गणरायाच्या मूर्तीला सिंदूर अर्पण करावे. यामुळे घरातील सकारात्मक गोष्टींचा वास राहतो. पूजेसहित आपल्या कुवतीनुसार मूग डाळ व तांब्याची भांडी दान करण्यात यावे.
बुध ग्रहाचा कुणाला दोष असेल तर तो दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक बुधवारी गोमातेला हिरवे गवत खायला दिले पाहिजे. यामुळे श्रावण महिन्यात सोमवार सहित बुधवारला देखील तितकेच महत्त्व दिले पाहिजे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.