नवरा बायकोचे अतूट प्रेम कायम सात जन्मापर्यंत टिकून राहिले पाहिजे, असे म्हणतात. कितीही संकटे आली तरी शेवटच्या एकमेकांच्या सोबत राहिले पाहिजे. कर्नाटक मधील एका व्यक्तीने पत्नीच्या मृत्यूनंतर हे असे काही केले जे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी केलेल्या या कृत्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

shrinivas gupta


कर्नाटकचे प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांच्या पत्नीचे 4 वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै 2017 मध्ये अपघाती निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर देखील
shrinivas gupta


यांचे प्रेम कमी झाले नाही. स्वतःचा एक बंगला असावा, असे श्रीनिवास यांच्या पत्नीचे स्वप्न होते. त्यांनी बंगला बांधला परंतु त्यांना त्यांच्या पत्नीची आठवण येत असल्याने त्यांनी एक गजब युक्ती वापरली.

श्रीनिवास यांनी पत्नी माधवी यांचा हुबेहूब मेणाचा पुतळा बनविला व मेणाच्या पुतळ्या सोबत नवीन बंगल्यात प्रवेश केला. डोळ्यांना विश्वास बसणार नाही असा उत्तम पुतळा तयार करण्यात आला. या पुतळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वजण चकित होत आहेत.

shrinivas gupta

हा पुतळा बंगलोर चे कलाकार श्रीधर मूर्ती यांनी तब्बल 1 वर्ष मेहनत करून बनविला आहे. हा पुतळा बनविण्यासाठी सिलिकॉन चा वापर करण्यात आला आहे. “माझ्या पत्नीला नवीन घरात पाहून मला खूप आनंद झाला” असल्याचे श्रीनिवास गुप्ता यांनी म्हटले.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *