बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूचे गूढ दोन महिन्यानंतर देखील तसेच कायम आहे. सुशांत ने आत्महत्या केली नाही असे म्हणत सुशांतच्या घरच्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने या प्रकरणाचा तपास चालू आहे. काही दिवसापूर्वी अमेरिकन पॅरानॉर्मल एक्सपर्ट स्टीव हफ याने सुशांतच्या आत्म्यासोबत बोलल्याचा दावा करून एकच खळबळ माजवली होती.
स्टीव हफच्या दाव्यानुसार त्याच्याकडे एक असे उपकरण आहे ज्यातून तो कोणाच्याही आत्म्यासोबत संवाद साधू शकतो. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो काही प्रश्न विचारताना दिसला. समोरून सुशांतसारखा आवाज ऐकू येत होता. त्या व्हिडिओज ची खूप चर्चा झाली व स्टीव हफ रातोरात स्टार झाला.
या व्हिडिओ मधून स्वतः सुशांतने त्याचा खून करण्यात आला, असे म्हटल्याचा स्टीव ने दावा केला. स्टीवच्या दाव्यावर संशय घेत अखेर भारतातील काही व्यक्तींनी सत्य समोर आणले आहे. स्टीव्हच्या व्हिडिओमधील आवाज सुशांतच्या आत्म्याचा नसून तो आवाज त्याच्या जुन्या मुलाखतीमधील असल्याचे उघड केले आहे.
3 वर्षांपूर्वी सुशांतने अनुपमा चोप्राला इंग्रजी भाषेत मुलाखत दिली होती. त्याच मुलाखतीतील सुशांतचे वाक्य कट करून स्टीव्ह हफ याने खोटे व्हिडिओ बनविले आहेत. त्यामुळे स्टीव चे पितळ उघडे पडले असून त्याच्या बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.