कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. भारतात देखील कोरोना ने थैमान घातले असून अनेक मोठ्या सेलिब्रिटिजना देखील याची लागण झालेली ऐकायला मिळत आहे. आता मराठी इंडस्ट्री मधील एका मोठ्या अभिनेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

subodh bhave corona positive news


मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते सुबोध भावे यांचा कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्स मध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे. सुबोध बरोबर त्यांच्या घरातील दोन सदस्यांना देखील कोरोना झाला आहे. यात त्यांची पत्नी म्हणजे मंजिरी व मोठा मुलगा कान्हा यांचा समावेश आहे.

subodh bhave corona positive news


सुबोध भावे यांनी पोस्ट करीत सांगितले की,”मी मंजिरी व माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही सर्वांनी घरीच स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने उपचार घेत आहोत. गणपती बाप्पा मोरया” तसेच सुबोधने फॅन्सना स्वतःची काळजी घेण्यास व सुरक्षित राहण्यास देखील सांगितले.

सुबोध भावे हे काही दिवसापूर्वी जी झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी. त्या सोहळ्याला अन्य मराठी कलाकार देखील उपस्थित होते. त्यामुळे त्यांची देखील टेस्ट होण्याची शक्यता आहे. सर्व मराठी कलाकारांनी सुबोधला लवकर बरे होण्यासाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा व शेअर करायला विसरू नका.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *