सुशांत सिंग राजपूत याच्या वडिलांनी रीया चक्रवर्ती वर मनी लॉन्ड्रिंग आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणी रीया व तीचा भाऊ शौविक यांची 7 ऑगस्ट रोजी ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रीयाला 9 तासाच्या तपासणीत कोणते प्रश्न विचारण्यात आले ते पाहुयात..

sushant case new update


रिया ज्या वेळेस आत गेली त्यावेळेस पहिला अर्धा तास तिने एकही शब्द काढला नाही व तिच्यावर वकीला समोरच बोलणार असल्याचे तिने सांगितले. परंतु जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिला ही गोष्ट लिखित देण्यास सांगितले त्यावेळी रिया उत्तर देण्यास तयार झाली. चौकशीच्या सुरुवातीला रियाने मनी लॉन्ड्री न चे सर्व आरोप फेटाळून लावले.

sushant case new update


रियाचे दोन बँकेत असलेल्या खात्यातील रकमेबद्दल ईडीच्या अधिकाऱ्याने रियाला विचारले असता, रियाने समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे समजते. तसेच रियाचं वार्षिक उत्पन्न 14 लाख रुपये असताना तिने दोन महागडी घरे कसे विकत घेतली? याचे देखील रियाने व्यवस्थित उत्तर दिले नाही.

sushant case new update

तसेच सुशांतच्या बँक अकाउंट डिटेल नुसार रियाच्या अकाऊंट मध्ये ट्रान्सफर झालेल्या पैशाबद्दल देखील रियाला विचारण्यात आले. या प्रश्नाला देखील रियाकडून योग्य उत्तर मिळाले नाही. सुशांत, रिया आणि शौविक हे तिघे पार्टनर असलेल्या कंपनी बद्दल विचारताना शौविकला सुशांत ने पार्टनर का करून घेतले होते, हा देखील प्रश्न विचारण्यात आला.

sushant rhea investigation

या प्रश्नाचे उत्तर मात्र रीया देऊ शकली. तीने म्हटले, “मी व सुशांत एकत्र आलो तेंव्हा सुशांत ची ओळख शौविक सोबत झाली. नंतर दोघे चांगले मित्र झाले आणि सुशांतनेच त्याला पार्टनर करून घेण्याचा निर्णय घेतला होता.” रिया ने समाधानकारक उत्तर नाही दिल्याने तीची परत 10 ऑगस्ट रोजी तिच्या वडीलासोबत चौकशी केली जाणार आहे. शोविक ची तर तब्बल 18 तास ई डी कडून चौकशी करण्यात आली.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *