सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणात मागील काही दिवसांपासून रोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर संशय वाढत असतानाच आता सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याची चौकशी होवू शकते.

sushant friend siddharth


सोशल मीडयावर सुशांतच्या फॅन्स कडून सिद्धार्थची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. कारण सिद्धार्थ हा सुशांतचा गेल्या वर्षभरापासून फ्लॅट मेट होता. परंतु, आता त्याच्या एका खोट्या व्यक्तव्यामुळे तो संकटात सापडू शकतो. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ ला रीयाबद्दल विचारण्यात आले त्यावेळी सिद्धार्थ ने मी रियाला ओळखत नसल्याचे सांगितले होते.

sushant friend siddharth

आता रियाची कॉल रेकॉर्ड समोर आल्याने सर्व पितळ उघडे पडले आहे. त्या कॉल रेकॉर्ड नुसार रिया व सिद्धार्थ या दोघात खूपदा बोलणे झाल्याची माहिती समोर आले आहे. गेल्या वर्षभरात रिया व सिद्धार्थ या दोघांनी एकमेकांना 101 वेळा कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. सुशांतचा मृत्यू झाला तेंव्हा सर्वप्रथम सिद्धार्थ ने त्याची बॉडी पाहिल्याचे म्हटले होते.

sushant friend siddharth

स्वतःला या प्रकरणातून दूर ठेवू पाहणाऱ्या सिद्धार्थच्या या खोटेपणामुळे त्याच्यावरील संकटे वाढण्याची शक्यता आहे. रिया व सिद्धार्थ मध्ये काही गुपित होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कालच सिद्धार्थ ची चौकशी करण्यात आली व यापुढेही रिया सोबतच सिद्धार्थला देखील चौकशी साठी बोलविण्यात येऊ शकते.

sushant friend siddharth


रियाच्या कॉल रेकॉर्ड नुसार महेश भट्ट यांना 18 वेळेस, सुशांत ची मॅनेजर श्रुती मोदी हिला 791 वेळेस, भाऊ शौविकला 1069 वेळा, वडीलाला 1192 वेळेस कॉल केले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ही माहिती उपयुक्त ठरली जाऊ शकते.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *