सर्वच स्तरातून सुशांत सिंग राजपूत प्रकरणांची तपासणी सीबीआय कडे देण्याची मागणी करण्यात येत होती. केंद्र सरकारने आता ती मागणी स्वीकारली आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी सुशांत व त्याची बहीण श्वेता यांच्यात झालेले संभाषण श्वेताने शेयर केले आहे.
श्वेताने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर मेसेजेस ची स्क्रीनशॉट शेयर केला आहे. पहिल्यांदा 9 जून रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान श्वेताने सुशांतला हे तीन मेसेजेस केले होते. “कसा आहे माझा बाबू? लव्ह यू”, “माझ्या इकडे यायचं आहे का तुला?”, “राणी दिदी आणि तू दोघे या इकडे”.
या मेसेजेसला सुशांतने 10 जून रोजी पहाटे 4.45 वाजता रिप्लाय दिला. सुशांत चा रिप्लाय पाहून तो त्याच्या जीवनात नक्कीच आनंदी नव्हता असेच दिसत आहे. त्याने असा रिप्लाय दिला “मनात खूप इच्छा आहे येण्याची दी”. सुशांतने ही इच्छा अशीच अपूर्ण सोडून तिच्या बहिणीला कायमचा सोडून गेला.
नंतर सुशांतच्या बहिणीने त्याच सकाळी 6.50 वाजता असा रिप्लाय दिला, “मग ये ना बेबी..एक महिन्यासाठी ये..शांत रहा इकडे..चांगले वाटेल तुला..मला माझ्या मित्रमैत्रीणीना तू इथे आहेस हे सांगायचं आहे..मी काल जिथे फिरायला गेले होते तिथे आपण सगळे जाऊयात.” सुशांतच्या बहिणीला जराही कल्पना नव्हती की सुशांत नंतर तिला कधीच भेटू शकणार नाही.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा