संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवीन नवीन धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. आता एक अशीच आणखीन एक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या बॉडीला नेण्यात आलेल्या दवाखान्यातील एका कर्मचाऱ्याने एक अशी माहिती मीडियाला दिली आहे यावरून तो हत्येचा कट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

sushant new cbi updates


14 जून 2020 रोजी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी कूपर हॉस्पिटल येथे नेण्यात आला होता. तेथील एका कर्मचाऱ्यांने न्यूज नेशन या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असे म्हटले, “मला सुशांतचा खून केला आहे असे वाटतं कारण, सुशांतच्या गळ्यावर पंधरा-वीस सुई ने टोचल्यासारखे निशाण दिसले. तसेच, फाशी घेतलेल्या व्यक्तीच्या तोंडातून फेस निघत असतो, सुशांतचा निघाला नाही.”

sushant new cbi updates


पुढे बोलताना कर्मचारी म्हणाला, “सुशांतचे शरीर पिवळे पडले होते, जे फाशी घेतल्यास पडत नसते. मी ज्यावेळेस सुशांतच्या बॉडी ला दवाखान्यातून स्मशानभूमीकडे नेण्यासाठी उचलत होतो, त्यावेळी सुशांतचा पाय मोडलेला दिसून आला.”

steve huff truth

पुढे धक्कादायक माहिती देताना त्या कर्मचाऱ्याने सांगितले की, “डॉक्टर देखील म्हणत होते की हा खून आहे आहे. परंतु पोलिसांनी डॉक्टरांना पैसे दिले असणार. तसेच, सुशांतचा पोस्टमार्टम रात्री केल्याचे डॉक्टरांनी सांगितले परंतु ती बातमी खोटी असून त्याचा पोस्टमार्टम सकाळी आठ वाजता करण्यात आला.

कर्मचार्‍याच्या या धक्कादायक खुलास्याने सीबीआयला मदत मिळण्याची शक्यता आहे. माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेअर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *