सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती वर पैसे उकळण्याचा लावलेल्या आरोपामुळे रीयाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आता या प्रकरणात सुशांतच्या बॉडीगार्डने तोंड उघडले असून त्यांनी मोठे मोठे खुलासे केले आहेत. सुशांतच्या जीवनात रीया चक्रवर्ती आल्यापासून सुशांत मध्ये काय काय बदल झाले याबद्दल बॉडीगार्ड ने एका मुलाखती दरम्यान सांगितले.
बॉडगार्ड ने सांगितले, “सुशांत यांच्या वडिलांनी लावलेले आरोप खरे आहेत व याबाबतीत सखोल चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे. सुशांत हे गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती वर वायफळ खर्च करायचे. अनेकदा ते खाली रूम मध्ये झोपायचे आणि सुशांतच्या पैशावर वरी रिया, तिचा भाऊ व तिचे वडील अन्य काही सदस्य धूम धाम पार्टी करायचे.

पुढे बोलताना बॉडीगार्डने असे सांगितले, “रीया सुशांत यांच्या जीवनात आल्या पासून सुशांतच्या जीवनात खूप बदल झाला होता. घरातील सर्व स्टाफ म्हणजेच नौकर, शेफ यांना काढून नवीन लोकांना कामाला ठेवले होते. सुशांतचा सीए देखील बदलण्यात आला होता. रियाला एके दिवशी मी महेश भट्ट यांच्या ऑफिस मध्ये सोडायला गेलो होतो.”
दरम्यान या मुलाखती मधून एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे. सुशांतच्या वडिलांनी 25 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईच्या एसपी ना एक पत्र लिहिले होते ज्यात त्यांनी सुशांत च्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. या सर्व बाबींचा विचार करता रियाची या प्रकरणात संकटे वाढणार हे नक्की.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा