sushant sing disha dance

सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूपूर्वी 8 जून रोजी त्याची एक्स मॅनेजर दिशा सलियन हिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. काही दिवसातच सुशांतचा मृत्यू झाल्याने दोन्ही प्रकरणाला एकत्र जोडले जाऊ लागले होते.

sushant sing disha dance video


या प्रकरणी आता दिशाचा हा नवा व्हिडीओ समोर आल्याने तिने खरंच आत्महत्या केली का असा संशय निर्माण होत आहे. दिशा, तिचा होणारा नवरा व अन्य चार असे सर्वजण 8 जूनच्या रात्री पार्टी करीत होते. पहाटे 3 वाजता दिशा ने 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, असे सांगण्यात आले होते.

अगोदर स्वतः सीबीआयकडे तपास द्या म्हणणारी रीया घाबरली. आता म्हणते “मुंबई पोलिस..”

sushant sing and manager


दिशाचा पोस्टमार्टम रिपोर्ट देखील समोर आला असून दिशा ज्यावेळेस खाली पडली त्यावेळेस ती नग्न अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आत्महत्येपूर्वी दिशावर अत्याचार झाले होते का असा देखील प्रश्न उपस्थित होतो.इतके दिवस हा व्हिडिओ कुठे होता आणि दिशा नग्न अवस्थेत होती ही माहिती इतक्या दिवसाने समोर आल्याने मुंबई पोलिसांवर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले आहेत.

दिशाच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये दिशा बेधुंद नाचताना दिसून येत आहे. मिशन कश्मीर या चित्रपटातील गाण्यावर दिशा व तीचे काही मित्र नाचत आहेत.  हा व्हिडिओ दिशानेच सर्व मित्रांना व्हॉट्सअँप द्वारे पाठविला होता अशी सूत्रांकडून माहिती मिळते. इतके नाचत असताना दिशा आत्महत्या करूच शकणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *