सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रीया चक्रवर्ती वर सुशांत कडून पैसे उफलल्याचे आरोप लावण्यात आले. या आरोपामुळे सर्वच स्तरातून रीयावर ताशेरे ओढले जाऊ लागले होते. परंतु या प्रकरणात आता चक्क अंकिता लोखंडे वर ईडीकडून गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
ईडीच्या म्हणण्यानुसार अंकिता राहत असलेल्या फ्लॅटचे हफ्ते हे सुशांतच्या बँक अकाउंट मधून कपाट होत आहेत. सुशांत व अंकिता या दोघांनी हा फ्लॅट घेतला होता व ब्रेक अप नंतरही सुशांतच्याच अकाउंटमधून घराचे हप्ते कपात होत असल्याचा आरोप ईडीने केला होता. यावर अंकिताने कसलाही विचार न करता तरी तसेच सोशल मीडियावर त्या संदर्भात पुरावे जाहीर केले आहेत.
अंकिताने पोस्ट करताना लिहिले, “इथे मी सर्व अनुमानाना पूर्णविराम देते. यापेक्षा पारदर्शी असू शकणार नाही. इथे मी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन पेपर व बँक अकाऊंटचे 1 जानेवारी 2019 पासून ते 1 मार्च 2020 पर्यंतचे सर्व डिटेल्स देत आहे. माझ्या अकाऊंट मधूनच सगळ्या ईएमआय चे पैसे कपात झाले आहेत. मी यापेक्षा जास्त काही नाही बोलू शकत. सुशांतला न्याय मिळावा.”
अंकिताने पोस्ट केल्यानंतर सुशांतच्या बहिणीने त्यावर प्रतिक्रिया दिली. “तू एक आत्मनिर्भर महिला आहेस. मला तुझा अभिमान आहे मुली.” सुशांतचा मित्र अभिनेता महेश शेट्टी यांनीदेखील यावर कमेंट केली. “तुला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. आम्हाला तुझा गर्व आहे” फॅन्स कडून सोशल मीडियावर वाईट प्रतिक्रिया येण्यापूर्वीच अंकिताने पुरावे दिले आहेत.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..