सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण सीबीआयकडे तपासणी साठी गेल्या नंतर तपासाला वेग आलेला दिसून येत आहे. सीबीआयने या प्रकरणाची सुरुवातीपासून चौकशी सुरू केली आहे. सीबीआयचे एक पथक कूपर हॉस्पिटलमध्ये(जिथे सुशांतचे पोस्टमार्टम करण्यात आले) चौकशीसाठी गेले असता काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कूपर हॉस्पिटलमधील ज्या 5 डॉक्टरांनी सुशांतचे शवविच्छेदन केले होते, त्यांची सीबीआय ने चौकशी केली. सुशांत पोस्टमार्टम रिपोर्ट लवकर का देण्यात आला होता, यावर उत्तर देताना त्यांनी मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरून लवकर दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणखीन अडचणीत सापडली आहेत. काल दुपारीच सीबीआयला सुशांतला पोस्टमार्टम रिपोर्ट भेटला होता.
तसेच, रिपोर्ट येण्यापूर्वी रियाला दवाखान्यात येण्याची परवानगी कोणी दिली याबद्दल देखील मोठे प्रश्नचिन्ह उभे आहेत. रीया जवळपास 45 मिनिट हॉस्पिटल मध्ये थांबली होती. तसेच डॉक्टरांनी लिहिलेल्या रिपोर्टनुसार सुशांतने स्वतः जीवन संपविले का? यावर देखील संशय निर्माण होतो.
रिपोर्ट नुसार, सुशांतच्या गळ्यावर एक मोठी खूण होती, तसेच त्याची जीभ देखील बाहेर आली नव्हती. शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा दिसून आल्या नाहीत व कोणतेही हाडे मोडलेली नव्हती, तसेच सुशांतच्या अर्ध्या पापण्या झापलेल्या होत्या. या रिपोर्ट वरून सुशांत चे वडील के किसिंग यांनी संशय व्यक्त केली आहे. परंतु आता सीबीआय फोटोची चौकशी करतील व सर्वकाही खरी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा..