2020 या वर्षभरात अभिनय क्षेत्रातील कलाकारांच्या मृत्यूच्या वार्ता थांबायला नाव घेत नाहीत. अशातच सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर आता लोकप्रिय टीव्ही कलाकार समीर शर्मा याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर समीर शर्माच्या आत्महत्येला सुशांत प्रकरणाशी जोडण्यात येत आहे.
समीर शर्मा याच्या आत्महत्येला सुशांत शी या काही कारणाने जोडण्यात येत आहे. पहिले कारण म्हणजे समीर शर्मा याने देखील एकता कपूरच्या प्रोडक्शन मध्ये काम केले होते आणि दुसरे कारण समीरचा एक जूना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो रडताना दिसत आहे. परंतु हा व्हिडिओ दीड वर्षापूर्वीचा असून त्यात तो फक्त अभिनय करीत होता.
काही दिवसापूर्वी सुशांत बद्दल त्याने लिहिली पोस्ट वाचून देखील तो आत्महत्या कसे करू शकतो, यावर संशय निर्माण होत आहे. त्या पोस्ट मध्ये “नैराश्य ही एक धोकादायक गोष्ट आहे. या मध्ये व्यक्तीला खूप एकटेपणा वाटत असतो. ही एक वेदना आहे जी सहन केली जाऊ शकत नाही. ज्या परिस्थितीत कोणी आपला जीव घेत असतो, त्याबद्दल कोणालाही कल्पना नसते. कोणी विचार पण करू शकत नाही.
पोलिसांना माहिती मिळाली त्याच्या 2 दिवसापूर्वीच 44 वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु समीरच्या आत्महत्येचा सुशांत प्रकरणासोबत काही संबंध आहे का, हे पुढील चौकशीत कळेलच. समीरच्या जाण्याने एक चांगला कलाकार गेल्याचे दुःख फॅन्स मध्ये होत आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..