सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला दिसून येत आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर प्रत्यक्षरीत्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केल्यानंतर रियाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवित सुशांतच्या वडिलांनी बिहार मध्ये तक्रार दाखल केल्याने बिहार पोलिस रियाची तपासणी करण्यास मुंबईला आले होते.
बिहार पोलिसांच्या तपासणीतून सुटका होत नाही तोपर्यंतच रियाला आता सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः रियाने पोस्ट करीत सुशांत प्रकरणांची तपासणी सीबीआयकडे देण्यात यावी अशी विनंती ग्रहमंत्री अमित शहा यांना केली होती. स्वतः तह सीबीआयकडे तपासणी करण्याची मागणी करणारे रिया आता सीबीआय चौकशी बेकायदेशीर आहे असे म्हणते.
रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याबद्दल बोलताना म्हटले, “बिहार सरकारने कायदेशीर असलेल्या मुंबई पोलिसां ऐवजी खटला सीबीआय’कडे वर्ग केला. रिया चक्रवर्ती यांनी त्याबद्दल सुप्रीम कोर्टात अगोदरच याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना तपास करण्याचे निर्देश दिले आहेत,”.
पुढे बोलताना माने शिंदे म्हणाले, “सीबीआयने देखील बेकायदेशीर पणे बिहार पोलिसांची कारवाई नोंदवून घेतली. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार सीबीआयला सहमती दर्शविल्या शिवाय त्यांचा तपास पूर्णपणे बेकायदेशीर ठरवला जाईल.” रियाचे वकील असे म्हणत असले तरी अगोदर स्वतः सीबीआय चौकशीची मागणी करणारी रीया आता का घाबरत आहे, हाच प्रश्न उपस्थित होत आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..