सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा अत्यंत जवळचा मित्र व फिल्म मेकर सुरजित सिंग राठोड याने काही धक्कादायक व्यक्तव्य केले आहेत. यामध्ये त्याने रिया चक्रवर्ती व चित्रपट निर्माता संदीप सिंग यांच्याबद्दल मोठे खुलासे करतानाच संशय देखील व्यक्त केला आहे. रियाने शवग्रहात सुशांतच्या मृतदेहाला पाहून बोललेले शब्द व संदीप सिंग याने पोलिसांना केलेला इशारा याबाबत सांगितले आहे.

sushant rhea last word


सुशांतचा मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 जून रोजी रिया चक्रवर्ती कूपर हॉस्पिटलमध्ये आढळून आली होती. त्याबद्दल बोलताना सुरजित सिंग ने म्हटले, “मी त्या दिवशी 11 वा. कूपर हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. नंतर 11.30 वाजता माझा मित्र सुरज सिंग तिथे रीयासोबत आला. रियाला सुशांतचा मृतदेह पाहायचा आहे, यासाठी त्याने मला पोलिसांची संमती घेण्यास सांगितले. मी पोलिसांना बोलून रियाला शवग्रहात घेऊन गेलो.”

sushant rhea last word


“शवग्रहात गेल्यास जसे मी सुशांतच्या चेहर्‍यावरून चादर खाली केली, तेंव्हा रियाने त्याच्या छातीवर हात ठेवला व तिने “सॉरी बाबू” असे म्हटले. मी रीयाचे हे शब्द ऐकून शॉक झालो. तीने कोणत्या कारणासाठी सॉरी म्हटली हे आजपर्यंत कळले नाही. आम्ही आत मध्ये 5 ते 7 मिनिट होतो. बाहेर रियाची आई व भाऊ शौवीक हे देखील आले होते व त्यांनी देखील सुशांतच्या मृतदेहाला पाहण्याची इच्छा दाखवली होती. परंतु पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही.” असे पुढे सुरजित सिंग ने सांगितले.

sushant rhea last word

यासोबतच सुरजित सिंग यांनी चित्रपट निर्माता संदीप सिंग याच्या हावभावावर देखील संशय व्यक्त केला आहे. “मला तर वाटतं संदीप हाच खुनी आहे व तोच या केसला हँडल करत होता. त्यानेच पोलिसांना सांगून मला दवाखान्यातून बाहेर काढले होते. तसेच त्याने पोलिसांना हाताने काहीतरी इशारा केल्याचे देखील दिसून आले होते.” असा गंभीर आरोप सुरजित सिंग ने संदीप सिंग वर लावला आहे. त्यामुळे संदीप सिंगची देखील सीबीआय चौकशी करू शकतात.

sushant rhea last word

 

माहिती कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रिया कळवा व शेअर करायला विसरू नका


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *