सुशांत सिंग राजपूत प्रकरणात दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा पोलीस वेगवेगळ्या दिशेने तपास करीत आहेत. बिहार पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाला वेग मिळाला असून सुशांतच्या आत्महत्येला दिशाच्या (सुशांतची एक्स मॅनेजर) आत्महत्येशी काही संबंध आहे का याबद्दल देखील चौकशी करण्यात येत होती.
सुशांत ने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली, परंतु त्याच्या काही दिवस अगोदर म्हणजे 8 जून रोजी रात्री दिशा सलियान हिने मुंबई मधील एका एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशा तीचा प्रियकर रोहन रॉय व अन्य 4 व्यक्ती पार्टी करीत होते. त्या 4 व्यक्ती मध्ये राजकीय नेते असल्याचे बोलले जात होते.
मुंबई पोलिसांनी याबद्दल खुलासा करताना सांगितले,”आम्ही सीसीटीव्ही फूटेज चेक केले आहे. दिशाच्या पार्टी मध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते नव्हते.” त्या रात्री दिशा पार्टी मधून मैत्रिणीला फोन करण्यासाठी रूम मध्ये जाते असे सांगून गेली. परंतू ती काही वेळ बाहेर आली नव्हती. शेवटी वाचमन ने सर्वांना माहिती दिली की दिशा खाली पडली आहे.
आर्थिक नुकसान झाल्यामुळे दिशाने नैराश्यात जाऊन जीवनयात्रा संपवली होती. परंतु अगोदरच नैराश्यात असलेला सुशांत हा दिशाच्या या घटनेमुळे आणखीन जास्त डिप्रेशन मध्ये गेला असावा. दिशाच्या आत्महत्येशी सुशांतचा काहीही संबंध नसला तरी त्याला भीती होती की दिशासोबत त्याचे नाव जोडले जाईल.
बिहार पोलीस दलाचे महासंचालक गुप्तेश्र्वर पांडे यांना दोन्ही घटनाचा एकमेकांशी संबंध असल्याचा संशय वाटत आहे. परंतु त्यांनी याबाबतीत इतक्यात स्पष्ट करता येणार नसल्याचे सांगितले आहे. अगोदरच जास्त डिप्रेशन मध्ये गेलेला सुशांत या सर्व गोष्टी डोक्यात ठेवूनच जीवन संपविले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत होता. पोलीस तपासात यापुढे काय माहिती मिळते, यावरून सर्व काही स्पष्ट होईल.
माहिती आवडली तर शेयर करा..