जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसे सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसून येत आहे. सुशांत सिंगचा एक्स असिस्टंट अंकित आचार्य याने अखेर तोंड उघडले असून एका मुलाखती दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
अंकित आचार्य याने 2017 ते 2019 या वेळेत सुशांत सोबत वयक्तिक असिस्टंट म्हणून काम केले आहे. मुलाखत देताना अंकित म्हणाला, “मी जेंव्हा सुशांत भैय्या सोबत काम करायचो तेंव्हा मला कधीच मी त्यांच्या कडे काम करतो असे जाणविले नाही. मी त्यांचा एक कुटुंबातील सदस्य असल्यासारखे त्यांनी मला वागविले. ते एक कायम हसत राहणारे व्यक्ती होते.”
पुढे बोलताना अंकित म्हणाला, “मी सोबत असताना तर सुशांत भैय्या ने कधीच त्यांच्या रूमचा दरवाजा लॉक केला नव्हता. ते कायम दरवाजा उघडा ठेवायचे. मग मृत्यूवेळी दरवाजा बंद कसे राहिला? सुशांत भैय्याने आत्महत्या केली नाही, यावर मला पूर्ण विश्वास आहे. आत्महत्या केल्यास जीभ बाहेर निघते, गळ्यावर “व्ही” आकार येतो. परंतु फोटोमध्ये असे काही नाही दिसत आहे. त्यांची आत्महत्या केली नसून त्यांनी कुत्र्याच्या बेल्टने गळा दाबून त्यांचा खून करण्यात आला आहे, असा माझा संशय आहे.”
“मी सुशांत भैय्याच्या आयुष्यात असताना मला ते कधीच डिप्रेशनमध्ये दिसले नाहीत. मी जेंव्हा मित्राच्या वडिलाचे निधन झाल्यामुळे काही काळ गावी गेलो व जेंव्हा नंतर परतलो तेंव्हा रियाने सर्व नोकरदारांना बदलले असल्याचे समजले. सुशांत भैय्याच्या चेहऱ्याला पाहून ते डिप्रेशनमध्ये असल्याचे दिसून येते. अगोदर सारखे त्यांनी जास्त बोलले नाहीत. रिया जीवनात आल्यामुळेच त्यांच्यात इतका बदल झाला,” असे अंकितने पुढे बोलताना सांगितले.