सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येला दीड महिना उलटले असले तरी आत्महत्येचे खरे कारण आणखीन समजू शकले नाही. गेल्या दिड महिन्यात मुंबई पोलिसांनी अनेक व्यक्तींची कसून चौकशी केली परंतु त्यांना काहीच सुगावा लागला नाही. मुंबई पोलिसांचे अपयश पाहता सुशांतच्या वडिलांनी पटना पोलिसांची एक टीम मुंबईला पाठविली.
सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत पटना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रियाने सुशांतच्या बँक अकाउंट मधून 15 कोटी उचलण्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपाची दखल घेत पटना पोलीस रिया व रियाच्या भावाची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
याच आरोपाची दखल घेत इडी(अंमलबजावणी संचालनालय)ने रिया विरूद्ध मनी लॉन्ड्रिंग(अवैधरित्या पैसे उचलणे)ची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे रियाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे दिसते. या संदर्भात ईडी रीयाची पुढील आठवड्यात चौकशी करणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना रियाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
पाहा व्हिडिओ :
“मला देवावर व न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. मीडियाद्वारे माझ्याविरुद्ध बरेच काही बोलले जात आहे परंतु मला काहीही न बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मला न्याय मिळेल व विजय सत्याचाच होईल. सत्यमेव जयते” असे रियाने व्हिडीओद्वारे म्हटले. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होईल हे येणाऱ्या दिवसात कळेल.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा