सुशांत सिंग राजपूत प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळे वळण घेत आहे. बिहार पोलिसांनी प्रकरणाला हाती घेतल्यानंतर व राजकीय दबावामुळे या प्रकरणातील तपासणीचा वेग वाढला आहे. अशातच सुशांतच्या घरच्यांनी मोठे गोप्यस्फोट करताना काही व्यक्तींवर आरोप देखील लावले आहेत.

सुशांतचा बॉडीगार्ड, एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे व सुशांतचे वडील या सर्वांनी दिलेल्या मुलाखतीमधून सुशांतचा खून करण्यात आला असावा अशी शंका उपस्थित होत आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सुशांतच्या वडिलांनी मोठी माहिती सांगितली आहे.
मुलाखतीत सुशांतच्या वडिलांनी असे सांगितले, “25 फेब्रुवारी 2020 रोजी मला मिळालेल्या माहितीनुसार सुशांतच्या जीवाला धोका असल्याचे बांद्रा पोलिसांना कळविले होते. 14 जूनला सुशांतच्या मृत्यूनंतर 25 फेब्रुवारीच्या तक्रारी मधील आरोपींना पकडण्यास सांगितले. परंतु चाळीस दिवस उलटले तरी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले नाही.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले, “पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्यानेच मी पटना पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.” 25 फेब्रवारीला बांद्रा पोलिसांना पाठविलेल्या ई मेल ची प्रत त्यांच्याकडे असल्याचा दावा सुशांतच्या फॅमिली वकिलाने केला आहे. सुशांतच्या वडिलांच्या आरोपपत्रात कोणाकोणाची नावे होती हे मात्र उघड करण्यात आले नाही.
माहिती आवडली तर शेयर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा