अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूचे गुढ कायम असले तरी पोलिसांना रोज नवनवीन माहिती मिळत आहे. सुशांतच्या मोबाईलची तपासणी केली असता अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. मोबाईल मधून कॉल रेकॉर्ड, जुने मेसेजेस सर्वकाही पाहिले असता पोलिसांना सुशांतच्या भावोजीने केलेले मेसेज दिसून आले आहेत. या मेसेजेस मध्ये रीया चक्रवर्ती संदर्भात अप्रत्यक्षरित्या उल्लेख केला आहे.
सुशांतची मोठी बहीण मितू सिंग ज्यांना सुशांत राणी दीदी म्हणायचा. मितू या सुशांत ला भेटायला फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबईला गेल्या होत्या. परंतु मितू यांना रिया चक्रवर्तीने घरी थांबू दिले नव्हते. नंतर संध्याकाळी सुशांतला सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी सोबत येण्यास सांगितले, तेंव्हाही रियाने सुशांतला त्यांच्यासोबत जाऊ दिले नाही.
या घटनेनंतर मितू यांचे पती हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस ओपी सिंग यांनी सुशांतला हे 5 मेसेजेस केले होते.
1. मी चंदिगड पोहोचलो आहे. तुझ्या मदतीसाठी धन्यवाद. मला माझ्या जुन्या मित्रांची आठवण आली.
2. मला खुशी आहे की तू तुझ्या जीवनाचा इन्चार्ज नाहीस. मी माझी ट्रिप स्वतः प्लॅन केली आणि माझा अंदाज बरोबर होता.
3. माझ्या बायकोला या प्रकरणापासून लांब ठेवा. माझी बायको खूप चांगली आहे. तिला कसल्याही प्रकारचे दुःख होवू नये असे मला वाटते.
4. एक मीच आहे जो तुझी मदत करू शकतो आणि मी आत्ता पण तुझ्या सोबतच आहे. तुझी काळजी घेणारी कधी ही माझ्या ऑफिस मध्ये संपर्क करू शकतात. मी गरज पडेल तेंव्हा तुला मदत करेल.
5. मी हे मेसेजेस तुला यासाठी पाठवीत आहे कारण या मुद्द्यावर माझे काय मत आहे हे तुला कळायला हवे. जर तुला माझे बोलने चुकीचे वाटत असेल तर दुर्लक्ष करू शकतोस.
वरील मेसेज हे सुशांतचा फ्लॅट सिद्धार्थ पिठानी द्वारा कळाले आहेत, परंतु सुशांतच्या भाऊजींनी याबद्दल आणखीन काहीही बोलले नाहीत. आता या प्रकरणात बिहार सरकारची विनंती स्वीकारत सीबीआय चौकशी करण्यास केंद्र सरकारने समंती दिली आहे. त्यामुळे याप्रकरणाचा उलगडा लवकरच होवू शकतो.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा