सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सर्वस्तरातून या प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात येत होती. त्याबाबतीत आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे प्रवर्ग करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सीबीआयचा हस्तक्षेप होण्याअगोदरच सुशांतच्या रूमच्या दरवाजाचे लॉक तोडणाऱ्या चावीवाल्या ने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
चावीवाल्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असे सांगितले, “14 जून रोजी मला एका व्यक्तीचा फोन आला व त्यांनी एका दरवाज्याचे लॉक काढायचे आहे, असे सांगितले. मी त्यांना त्या दरवाज्याच्या लॉकची फोटो व्हाट्सअपला पाठवायला सांगितला. त्यांनी सुरुवातीला उघड्या असलेल्या दरवाज्याचे फोटो पाठविले. मग मी त्यांना त्याच दरवाजाची फोटो मागितली व नंतर त्यांनी पाठविली.”
“नंतर मी त्यांना वाटेत असताना एकदा कॉल केला व खरेच येऊ ना अशी पुष्टी केली. त्यांनी म्हटले तू ये, तोपर्यंत लॉक निघाले तरी तुला 2000 रुपये देण्यात येईल. मी तिथे गेलो व मला त्यांनी तो दरवाजा दाखविला. त्या दरवाजाला संगणकीय लॉक असल्याने चावी बनविण्यासाठी 1 तास लागणार होता. त्यांनी म्हटलं नाही आत मध्ये एक व्यक्ती आहे जो खूप वेळ पासून आत आहे आणि फोन पण उचलत नाही. नंतर मी लॉक तोडण्याचा निर्णय घेतला” असे पुढे बोलताना त्या चावी वाल्याने सांगितले.
“हातोड्याने लॉक तोडत असताना अचानक मला तिथल्या 3-4 व्यक्तींपैकी एकाने म्हटले आतून जर आवाज अाला तर लॉक तोडणे थांबव. मी लॉक तोडत असताना एक जण अधून मधून दरवाज्याला कान लावून आतून आवाज येतोय का चेक करीत होते.”
“मी ते लॉक तोडले पण दरवाजा उघडण्याच्या अगोदर त्यांनी मला पैसे दिले व तिथून जाण्यास सांगितले. मला आत कोण आहे हे माहिती देखील नव्हते. मी पैसे घेऊन आलो. नंतर मला 1 तासाने पोलिसांनी कॉल करून बोलावून घेतल्यास सर्व प्रकरण समजले.” असे त्या चावी वाल्याने सांगितले. त्या 4 व्यक्तींनी ज्यात सिद्धार्थ पिठानी देखील होता त्यांनी त्या चावी वाल्याला लगेच जाण्यास का सांगितले हाच प्रश्न निर्माण होत आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा