जसे जसे दिवस पुढे जात आहेत, तसे तसे सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील अनेक खुलासे झालेले दिसून येतात. सुशांत संबंधित अनेक व्यक्ती मीडिया समोर येऊन महत्वाची माहिती सांगत आहेत. आता सुशांतचा फ्लॅटमेट सम्युअल हावोकिप याने केलेल्या एका पोस्ट मुळे बॉलीवुड मधील माफिया लोकांना धोक्याची घंटा दिसून येत आहे.
सुशांत व अंकिता लोखंडे यांच्या ब्रेक-अप नंतर सुशांत याचे नाव काही अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. त्यातच सारा अली खान हे देखील एक नाव होते. सम्युअल ने एका पोस्ट मध्ये असे लिहिले, “केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशन वेळी सारा व सुशांत एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांना वेगळे करणे शक्य नव्हते. ते खूप पवित्र आणि लहान बाळासारखे इनोसंट होते.”
“दोघांचा एकमेकांबद्दल खूप आदर होता जो आजकाल नात्यामध्ये दिसून येत नाही. सुशांत सोबतच सारा सुशांतचे कुटुंब, मित्र व तसेच सर्व स्टाफचा आदर करायची. ‘ सोनचीरिया’ चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे बॉलीवूड मधील माफियांच्या डब्बा खाली साराने सुशांत सोबतचे नाते तोडले होते.” असे देखील सम्युअलने पोस्ट मध्ये लिहिले.
सम्युअलच्या या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली असून सीबीआय साराची देखील चौकशी करू शकते. तसेच सारा सुशांत यांच्या नाते तोडण्यासाठी कोणाचा दबाव होता, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यामुळे आता बॉलिवुडच्या माफियांद्दल प्रेक्षकांच्या मनात आणखीन राग वाढणार हे नक्की.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा