सुशांत सिंग राजपूत प्रकरणात त्याचे वडील केके सिंग यांनी पाटणा येथील पोलीस स्टेशनमध्ये जेव्हापासून रियावर केस दाखल केली आहे तेव्हापासून या प्रकरणात नाट्यमय घडामोडी चालू झाल्या आहेत. सुशांत संबंधित अनेक व्यक्तींनी रियावर गंभीर आरोप केल्याने रियाच्या समस्या वाढल्या आहेत.
आता या प्रकरणात सुशांतची थेरपिस्ट(रोगनिवारण तज्ञ) हिने अखेर मीडियासमोर तोंड उघडले आहे. सुशांतची थेरपिस्ट सुजैन वॉकर हिने सुशांत हा खरेच डिप्रेशन मध्ये होता हे स्पष्ट सांगितले आहे. तसेच, सुजैन ने रीया बद्दल असे काही व्यक्तव्य केले आहे, जे ऐकून या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळू शकते.
सुजैन ने म्हटले, “मी सुशांतची थेरपिस्ट म्हणून काम केले आहे. अर्थातच तो डिप्रेशन मध्ये होता. सुशांत डिप्रेशन मध्ये होता आणि रियाने त्या काळात सुशांतची खूप काळजी घेतली होती. रियाची काळजी पाहून मी तिच्यावर खूपच इंप्रेस झाले होते. दोघांमधील प्रेमही दिसून येत होते.”
सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांकडून व मीडियामध्ये रियावर गंभीर आरोप लावले जात होते. हे पाहूनच सूजैन ने मीडियासमोर येण्याचा निर्णय घेतला. सुशांतच्या वडिलांनी रिया वर लावलेले आरोप पाहून सुजन म्हणते, “मी त्यांच्या आरोपांना मान्य करीत नाही, उलट रियाने त्यांच्या मुलाची व्यवस्थित पणे काळजी घेतली होती, असे मला वाटते.” सुजैन ने केलेल्या या खुलाशामुळे रिया वरील संकटे काही प्रमाणात कमी होताना दिसू शकतील.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा.