बॉलिवूडला हादरवून टाकलेल्या सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला रोज काही ना काही वळण येत आहेत. मुंबई पोलिसांनंतर आता बिहार पोलिसांनी या प्रकरणात काही व्यक्तींची चौकशी करायला सुरुवात केली आहे. सुशांतला न्याय मिळावा यासाठी सर्वच स्तरातून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे.

sushant rajput steve new


मागील काही दिवसांपासून सुशांतच्या घरच्यांनी लावलेल्या आरोपावरून त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला संकटाचा सामना करावा लागणार असे दिसत आहे. सुशांतच्या दोन्ही बहिणी व सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ही नेहमीच आपल्या पोस्ट मधून सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी करीत आहेत.

sushant singh rajput case


सुशांतची बहिण श्वेता सिंग सुशांत संबंधित भूतकाळातील अनेक आठवणींना उजाळा देत आहे. यावेळी श्वेताने सुशांतच्या एका पांढऱ्या फळ्याचा (व्हाईट बोर्ड) फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर सुशांतने त्याच्या दैनिक नित्यक्रम बाबतीत लिहिले आहे.

sushant singh rajput case update

त्या बोर्डवर सुशांतने एक अशी गोष्ट लिहिली आहे जी वाचून सुशांतचे फॅन्स देखील भावूक झाले आहेत. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली असली तरी त्याने मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्या बोर्डवर 29 जून पासून व्यायाम करणार असल्याचे लिहिले आहे. म्हणजेच सुशांत ने भविष्याबाबत विचार करीत होता हे यावरून स्पष्ट होते.

sushant singh rajput case

त्या बोर्डवर सुशांतने पुस्तके वाचणे, चित्रपट व वेब सीरिज पाहणे, गिटार शिकणे, ध्यानधारणा करणे, स्वभावतलचा परिसर स्वच्छ करणे, ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या करणे अशा काही गोष्टी सुशांत ने लिहून ठेवल्या आहेत. श्वेताच्या या पोस्ट मुळे सुशांत ने आत्महत्या केली आहे की त्यांचा खून करण्यात आला? हा प्रश्न परत उपस्थित झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *