गेल्या बारा वर्षापासून टेलिव्हिजनवरील लोकप्रिय “तारक मेहता का उलटा चष्मा” या मालिकेने प्रसिद्धीचे अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले. या मालिकेत अनेक काही कलाकार बदलण्यात आले तर काही पात्रांचा उल्लेख करण्यात आला परंतु दाखविण्यात आले नव्हते. त्यात दयाची आई, तारक मेहताचे बॉस, पांडेजीची बायको-बासुंदी हे पात्र दाखविण्यात आले नव्हते.

tarak mehata latest news


आता मालिकेत या पात्रांपैकी एक पात्र दाखविले जाणार आहे. ते पात्र म्हणजेच तारक मेहताचे बॉस होय. तारक मेहता यांच्या बॉसचे पात्र राकेश बेदी हे साकारणार आहेत. खरे तर या बद्दल त्यांना 2008 मध्येच जेंव्हा मालिका सुरू झाली तेंव्हाच कळविण्यात आले होते. परंतु मालिकेने अनेक रहस्य कायम ठेवण्यात यश मिळविले.

tarak mehata latest news


राकेश बेदी हे उत्तम कलाकार असून त्यांनी यापूर्वी “भाभीजी घर पर है”, “श्रीमान श्रीमती”, “जबान संभालके” अशा मालिकेत भूमिका निभावल्या आहेत. त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी मालिकेची 14 ऑगस्ट पासून शूटिंग सुरू केली आहे व लवकरच माझ्या पात्राचे प्रसारण मालिकेत दाखविण्यात येणार आहे.”

tarak mehata latest news

“तारक मेहता यांच्या मुख्य कथेत देखील त्यांच्या बॉसचा उल्लेख केला आहे. परंतु मालिकेच्या सुरुवातीला या भूमिकेला जेठालालच्या प्रसिद्धीमुळे जास्त महत्त्व देण्यात आले नव्हते.” असे देखील राकेश बेदी यांनी पुढे बोलताना सांगितले. एकीकडे मालिकेतून काही कलाकार निघून जात असले तरी दुसरीकडे या रहस्यांचा उलगडा होत असल्याने मालिकेला आणखीन प्रसिद्धी मिळणार हे नक्की.

tarak mehata latest news


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *