28 जुलै 2008 रोजी सोनी सब वाहिनीवर “तारक मेहता का उल्टा चश्मा” ही मालिका सुरू झाली. या मालिकेने नेहमीच यशाची अनेक शिखरे गाठली. कारण या मालिकेला अगदी लहानपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी प्रेम दिले. या मालिकेमधून काही कलाकारांनी यापूर्वी मालिका सोडली होती. त्यात आता मालिकेतील अंजली मेहता(नेहा मेहता) व रोशन सिंग सोधी(गुरुचरण सिंग सोधी) यांनी मालिका सोडली होती.
या दोघांच्या जागी आता दोन नवीन कलाकार मालिकेत एन्ट्री घेताना दिसणार आहेत. यात अंजली मेहताचे पात्र यापुढे सूनैना फौजदार ही अभिनेत्री साकारताना दिसेल. ही अभिनेत्री यापूर्वी अनेक हिंदी मालिकेत दिसून आली आहे. सुनैना ने मालिकेची शूटिंग सुरू केल्याचे देखील समजते.
अंजली मेहता हे मालिकेतील महत्त्वाचे पात्र असून तिला मालिकेत तारक मेहताची पत्नीचा अभिनय साकारताना तारकला नेहमी डाएट फॉलो करण्यास सांगताना दिसत असते. परंतु गेल्या 12 वर्षापासून नेहा मेहता या अभिनेत्रीला अंजलीच्या रुपात पाहिल्यानंतर सुनैनाला प्रेक्षक स्वीकारतील का ते पाहणे मनोरंजक ठरेल.

सूनैना फौजदार ही 32 वर्षाची असून लागी तुझसे लगन, लेफ्ट राईट लेफ्ट, कबूल है, बेलन वाली बहू, एक रिश्ता साथी का अशा अनेक मालिकेतून उत्तम उत्तम भूमिका साकारल्या आहेत. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत ती कसे अंजलीचे पात्र साकारणार ते येणारा काळच सांगेल. तसेच, सोधी हे पात्र बलविंदर सिंग सोधी साकारताना दिसेल.
माहिती आवडली तर आपल्या प्रतिक्रिया कळवा व शेयर करायला विसरू नका