सोनी सब वाहिनीवरील 12 वर्षापासून चालत असलेली ही मालिका “तारक मेहता का उलटा चष्मा” जगभरात पोहोचली आहे. मालिकेतील सर्व कलाकारांनी आपापली भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. या मालिकेत जेठालालच्या वडिलांचा अभिनय करणाऱ्या कलाकाराच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.
“चंपकलाल गडा” हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचे खरे नाव “अमित भट” आहे. या मालिकेत त्यांना 75 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका साकारावी लागली आहे. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र ते 48 वर्षाचे आहेत. खरे तर त्यांच्या मुलाचे पात्र दिलीप जोशी (जेठालाल) हे त्यांच्यापेक्षा 4 वर्षाने मोठे आहेत. त्यांचा अभिनय पाहता ही खरंच आश्चर्याची बाब आहे.
अमित भट यांची पत्नी दिसायला खूप तरुण आणि सुंदर दिसते. त्यांच्या पत्नीचे नाव कृती भट्ट असून दोघांचे अनेक कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असतात. ज्यांना मालिकेत इतके वयोवृद्ध समजत होतो त्यांच्या पत्नीला पाहून प्रेक्षकांना नक्कीच धक्का बसला असणार.
अमित व कृती यांना 2 मुलं देखील आहेत. मालिकेतील वृद्ध माणसाची भूमिका साकारत असताना विनोद देखील उत्तमरित्या करतात. म्हणूनच त्यांना लहापणापासूनच ते मोठ्यापर्यंत सर्वजण प्रेम करतात. ते कायम प्रेक्षकांना हसवित राहतील, हीच अपेक्षा.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.