28 जुलै 2008 रोजी सुरू झालेल्या सोनी सब वाहिनीवरील तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेने यशाची अनेक शिखरे गाठली. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना या मालिकेने मनोरंजन केले. या मालिकेमधून काही कलाकारांनी अगोदरच मालिका सोडली होती. मालिकेतील दया, टप्पु, सोनू या पात्रांनी यापूर्वीच मालिका सोडली होती.
आता या मालिकेतून आणखीन 2 मुख्य कलाकार मालिकेला सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिले नाव म्हणजे, मालिकेत रोशन सिंग सोढ़ी पात्र साकारणारा गुरुचरण सिंग सोढ़ी या कलाकाराने मालिका सोडली आहे. त्याने यापूर्वीही 2012 ला मालिकेचे निर्माते अतिषकुमार मोदी यांच्यासोबत मतभेद झाल्याने मालिका सोडली होती.
गुरुचरण सोबतच मालिकेतील अंजली मेहताचा अभिनय करणारी नेहा मेहता देखील मालिका सोडणार असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे. मालिकेत तारक मेहताची पत्नीचा अभिनय साकारताना तारक ला नेहमी डाएट फॉलो करण्यास सांगताना दिसली. त्यामुळे ती मालिका सोडणार हे ऐकुन प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
गुरुचरण यांनी वैयक्तिक कारणाने मालिका सोडणार असल्याचे सांगितले. तर नेहा मेहता यांनी कोरोना मुळे शूटिंगला वेळ देणे शक्य होत नसल्याचे कारण सांगितले आहे. दोघेही शूटिंग सुरू झाल्यानंतर उपस्थित राहू शकले नाहीत. सोनू, टप्पू प्रमाणेच या 2 कलाकारांची जागा कोण घेणार, हे येणाऱ्या काळातच कळेल.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.