सर्वत्र कोरोनाचे सावट असूनदेखील सर्व टीव्ही मालिकांचे शुटींग सुरक्षेची खबरदारी घेऊनच सुरू आहेत. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले-2 नुकताच निरोप घेतला. आता या मालिके पाठोपाठ झी मराठीची आणखीन एक मालिका निरोप घेताना दिसणार आहे.
नवीन मालिका संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार असल्याने मिसेस मुख्यमंत्री ही मालिका निरोप घेणार आहे. त्यामुळे सुमी व समर या जोडीला पुढील काही दिवसच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिसेस मुख्यमंत्री नंतर आता झी मराठीवर “लाडाची मी लेक ग” ही नवीन मालिका प्रेक्षकांना दिसणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो आला असून, प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

“लाडाची मी लेक ग” या मालिकेचे ” विशाल गुप्ता “हे निर्माते असून त्यांनी 7 हिंदी मालिकेत अभिनेता म्हणून देखील काम केले आहे. झी टीव्हीवरील या मालिकेचे दिग्दर्शन “स्वप्नील मुरकर” यांनी केले आहे. या मालिकेत अभिनेत्याची भूमिका अरोह वेलणकर, अभिनेत्री मिताली मयेकर, स्मिता तांबे, उमेश जगताप व अन्य कलाकार दिसणार आहेत.
“लाडाची मी लेक ग” मालिकेत मिताली ही नर्सच्या भूमिकेत दिसेल, तर उमेश जगताप हे मितालीच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर अभिनेता अरोह हा स्मिता तांबे यांच्या मुलाचा अभिनय करताना दिसेल. मालिकेच्या प्रोमोवरून मालिका लोकप्रिय होणार असेच वाटत आहे.
तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा व शेअर करायला विसरू नका.