भारतीय लोक जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन स्वतःचे स्थान निर्माण करीत असतात. मग ती कोणतीही कला, खेळ असूद्या प्रत्येक क्षेत्रात भारतीय अग्रेसर राहिलेले पाहायला मिळत असतात. त्यामुळे भारतीय लोकांचे विदेशात नेहमीच कौतुक केले जाते. युनायटेड किंग्डम(युके) मधील एका गायनाच्या शोमध्ये एका लहान मुलीने असे काही केले की सर्व चकित झाले होते.
इंग्लंड मधील ब्रॉम्ले या गावात वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाची आद्या राजवंशी हिला गायनाची खूप आवड आहे. युकेचा लोकप्रिय शो “द व्हॉईस किड्स युके” या मध्ये आद्या ने सहभाग नोंदविला. युके मधील शो असल्याने बाकीचे सर्व कलाकार इंग्रजी गाणी गात होते. परंतु आद्याने हिंदी गाणे गाऊन परीक्षकांना चकित केले.
“द व्हॉइस किड्स युके” या शो चे ऑडिशन चालू होते. शोच्य नियमाप्रमाणे सर्व जज विरूद्ध दिशेला तोंड करून बसतात. आद्याने गाण्याची सुरुवात “चीप थ्रील्स” या लोकप्रिय इंग्लिश गाण्याने केली. गाण्याच्या मध्येच अचानक आद्याने बॉलिवुडच्या “रेस” चित्रपटातील “पहली नजर में” हे गाणे गाऊ लागली. हे गाणे ऐकताच सर्व जजच्या भुवया उंचावल्या.
चारही जज नी आद्यासाठी खुर्ची फिरविली व आद्याला पुढील राऊंड साठी निवडण्यात आले. या शोला विल्यम्स, पालोमा फेथ, पिक्सी लॉट आणि डॅनी जोन्स यांनी जज केले होते. तसेच, आद्याने पिक्सी लॉट हिच्या टीम मध्ये जायचे ठरविले होते. या एका परफॉर्मन्स मुळे आद्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.